कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाची 1962 साली स्थापना झाली. पहिल्या तीन वर्षात विद्यार्थी आणि विद्यार्थीनी वसतिगृहाची निर्मिती करण्यात आली. जेणेकरून बाहेरगावच्या विद्यार्थीनींना वसतिगृहात राहून शिक्षण घेता यावे. पहिल्यांदा वसतिगृहात फारच कमी संख्या होती. परंतू ती हळू–हळू वाढत जावून आता विद्यार्थ्यांच्या तुलनेत सध्या विद्यार्थीनींसाठी पाच वसतिगृह असून 1 हजार 500 विद्यार्थीनी राहतात. त्यामुळे ही वसतिगृह कमी असल्याने मुलींना सामावून घेताना वसतिगृह यंत्रणेवर तान येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन लोकवर्गणीतून लोकस्मृती वसतिगृहाची निर्मिती करीत आहे. यामध्ये अनेक दानशूर व्यक्ती पुढे येत असल्या तरी विद्यार्थीनींच्या तुलनेत वसतिगृह कमी पडत आहेत. विद्यापीठ प्रशासनाने पाठवलेल्या प्रस्तावांनाही अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे शासनेन कालसुसंगत विचार करून वसतिगृहांची संख्या वाढवण्यासाठी निधी देण्याची गरज आहे.
शिवाजी विद्यापीठात पारंपारिक अभ्यासक्रासह कौशल्याधिष्ठित पदवी, पदव्युत्तर आणि पदवीका अभ्यासक्रमाचे 48 अधिविभाग आहेत. यामध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमांची संख्या उल्लेखनीय असून यामध्ये जास्तीत जास्त मुली शिक्षण घेत आहेत. सुरूवातीला विद्यापीठात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांची 60 टक्केपेक्षा जास्त वाढली आहे. या विद्यार्थीनींना राहण्यासाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वाढत्या विद्यार्थीनींची संख्या पाहून वसतिगृहाच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या 5 वसतिगृह असली तरी दिवसेंदिवस वसतिगृह अपुरी पडत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळेच लोकसहभागातून वसतिगृहांची उभारणी करण्याची संकल्पना विद्यापीठ प्रशासनाने राबवली आहे. तसेच सुरक्षाही कडक असल्याने पालकांनी वसतिगृहात राहून शिक्षण घेण्याची परवानगी आपल्या मुलींना दिली आहे. याचाच अर्थ शिवाजी विद्यापीठ मुलींची संख्या वाढण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत असल्याचे सिध्द होत आहे.
शिवाजी विद्यापीठ तीन जिल्ह्यापुरते मर्यादीत असले तरी राज्यासह परदेशातील मुलीही येथे शिक्षण घेतात. या वसतिगृहात अधिविभागात शिक्षण घेत असलेल्या 1 हजार 200 तर एम. फिल., पीएच. डी. आणि कमवा व शिका योजनेत 100, डीओटीच्या 250 विद्यार्थीनी राहतात. पाच वसतिगृ असली तरी त्यांना दाटीवाटीने राहावे लागते, हे मोठे दुदैव आहे. शिक्षणापासून विद्यार्थीनी वंचित राहू नये म्हणून मागेल त्या विद्यार्थीनींना वसतिगृह दिले जाते. परिणामी एका रूममध्ये तीन ते चार विद्यार्थीनींना राहण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे वसतिगृहाची संख्या वाढली तर विद्यार्थीनींना व्यवस्थित राहता येईल, पूरक सुविधाही मिळतील. दानशुरांनी दिलेल्या देणगीतून लोकस्मृती वसतिगृह उभारण्यात येत असून संबंधीत वसतिगृह किंवा रूमला त्यांचे नावही दिले जाते. म्हणूनच दानशुरांनी शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थीनींना सुविधा मिळण्यासाठी पुढे येवून वसतिगृहाची निर्मिती करण्यास हातभार लावावा, असे आवाहनही शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
- प्रस्तावांना अद्याप मान्यता नाही
विद्यार्थीनींची संख्या पाहता विद्यापीठ प्रशासनाने विविध ठिकाणी प्रस्ताव पाठवले आहेत. या प्रस्तावांना अद्याप मान्यता मिळालेली नाही. तसेच आदिवासी वसतिगृह उभारण्याचा शासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी यावर वर्षानुवर्षे शासन दरबारी फक्त चर्चाच सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थीनी वसतिगृहांमध्ये विद्यार्थीनींना अडचणीचा सामना करून राहावे लागते. येवढेच नाही तर वसतिगृह यंत्रणेवरही ताण येत असल्याचे चित्र आहे.
- शासनाने वसतिगृहासाठी निधी द्यावा
शिवाजी विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या वाढत आहे, ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. कौशल्याधिष्ठीत शिक्षण मुलींना मिळावे म्हणून मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला. ही स्वागतार्ह गोष्ट असून, या निर्णयाचे पालक आणि विद्यार्थीनींकडून कौतुक होत आहे. वाढत्या मुलींच्या संख्येमुळे वसतिगृहाची कमतरता भासत आहे. त्यामुळे शासनाने वसतिगृहासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.
- लोकस्मृती वसतिगृह उभारण सुरू
शिवाजी विद्यापीठात येणाऱ्या मुलींनी वसतिगृहाची मागणी केल्यास उपलब्ध करून देण्याचे धारेण आहे. त्यामुळे वसतिगृहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलींना सामावून घ्यावे लागते ही वस्तुस्थिती आहे. मुलींच्या वसतिगृहाची संख्या वाढवण्यासाठी विद्यापीठाने विविध प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातील एक भाग म्हणून देणगीदारांच्या देणगीतून लोकस्मृती वसतिगृह उभारण्यात येत आहे.
डॉ. व्ही. एन. शिंदे (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ)








