इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मुर्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये चांगल्या मार्केट रिसर्च फर्म्स, आघाडीच्या युनिकॉर्न (1बिलियन अब्जपेक्षा जास्त मूल्याचे स्टार्टअप) संधींचा अतिरेक आणि मोठा तोटा भारताला होत असल्याचे मत इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मुर्ती यांनी येथे सिम्बायोसिस इंटरनॅशनलने आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी या विषयावर आपली मते नोंदवत खंतही व्यक्त केली आहे.
मुर्ती पुढे बोलताना म्हणाले की, भारताता या टप्प्यावर अशीही कमतरता आहे,की आमच्याकडे गुणवत्तापूर्ण बाजारात रिसर्चमध्ये तज्ञ असलेली कोणतीही कंपनी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याचा सर्व परिणाम म्हणजे उद्योजक बाजारातील संधी आणि गुंतवणुकीचा अतिरेक करुन युनिर्कार्न तयार करतात. असेही ते म्हणाले.
मार्केट रिसर्चच्या अभावाचा फटका
यावेळी विद्यार्थ्यांना सोबत संवाद साधताना मुर्ती म्हणाले, की मार्केट रिसर्चच्या गरजेवर भर दिला जात नाही. कारण या मार्केट रिसर्चच्या अभावामुळे मला स्वत:ला 1970 च्या दशकात पुण्यात स्थापन झालेली त्यांची पहिली कंपनी सॉफ्ट्रोनिक्स बंद करावी लागली असल्याची आठवणही त्यांनी यावेळी शेअर केली.









