सेन्सेक्स 283 तर निफ्टी 90 अंकांनी प्रभावीत : सलगची दुसरी घसरण
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी पुन्हा एकदा बाजारात घसरणीचा कल राहिला आहे. यामध्ये मागील तीन दिवसांमध्ये सोमवारी बाजारात तेजी, मंगळवारी आणि बुधवारी सलग दोन सत्रात घसरणीची नोंद करण्यात आली आहे. नवीन महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच बाजारात घसरणीचे सत्र सुरु राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 283.60 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 63,591.33 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात 90.45 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 18,989.15 वर बंद झाला. निफ्टी निर्देशाक 90 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला. बाजारात अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यात सनफार्मा, बीपीसीएल, हिंडाल्को आणि बजाज ऑटो यांचे समभाग तेजीत राहिले. तर निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक0.32 टक्क्यांनी नकारात्मक राहिला. तर बीएसई स्मॉलकॅपही प्रभावीत राहिला आहे.
बुधवारी बाजारात नकारात्मक स्थिती निर्माण झाल्यानंतर निफ्टीआयटी जवळपास एक टक्क्यांनी प्रभावीत राहिला. तर निफ्टी बँक, अदानी एंटरप्राईजेसचे समभाग हे 3.37 टक्क्यांनी नुकसानीत, कोल इंडिया 2.41, एसबीआय लाईफ 2.32 टक्क्यांनी घसरले आहेत.
याच्या विरुद्ध बाजूला मात्र सनफार्मा, बीपीसीएल, हिंडाल्को आणि बजाज ऑटो यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. बुधवारच्या बाजारातील चढउतारामुळे युनिपार्ट्स, ओम इंफ्रा, पटेल इंजिनिअर आणि अन्य कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले होते. गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभाग 0.52 टक्क्यांनी वधारले आहेत.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार द्विधा स्थितीत
भारतीयांसाठी दीपावली उत्सव सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांची मनस्थिती द्विधा झालेली आहे.









