युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने स्वागत
ओटवणे प्रतिनिधी
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व स्त्रि रोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व स्त्रि रोगतज्ज्ञपदी नियुक्ती करण्यात आली असुन डॉ. ऐवळे सोमवारी पदभार स्विकारणार आहेत. या पार्श्वभूमीवर युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व इतर पदाधिकाऱ्यांनी डॉ. ऐवळेंची सावंतवाडीत भेट घेत त्यांचे स्वागत केले आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रि रोगगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेवर नियुक्तीसाठी युवा रक्तदाता संघटनेने राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचेही लक्ष वेधले होते. डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे गेली २७ वर्षे जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी दोनवेळा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम केले आहे.
दरम्यान डॉ. ऐवाळे यांच्याकडे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांचाही पदभार देण्यात यावा यासाठी युवा रक्तदाता संघटनेंने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागरगोजे यांचेही लक्ष वेधले आहे. सावंतवाडीत डॉ. ऐवाळे यांच्या स्व स्वागतावेळी मेहर पडते, अर्चित पोकळे, सिध्देश मांजरेकर, प्रथमेश प्रभू आदी युवा रक्तदाता संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.









