वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू महिन्याच्या अखेरीस खेळवल्या जाणाऱ्या 2023 च्या टेनिस हंगामातील शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेतून ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू निक किरगॉईसने दुखापतीच्या समस्येमुळे माघार घेतली आहे.
गेल्या जानेवारी महिन्यात किरगॉईसच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या समस्येमुळे तो विम्बल्डन तसेच एटीपी टूरवरील वॉशिंग्टन, टोरँटो आणि सिनसिनॅटी टेनिस स्पर्धेतून त्याने माघार घेतली होती. 2017 साली झालेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत किरगॉईसने रशियाच्या मेदव्हेदेवचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्याचप्रमाणे जर्मनीच्या स्ट्रफने आपण अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत काही वैयक्तिक समस्येमुळे सहभागी होऊ शकणार नसल्याचे स्पर्धा आयोजकांना कळवले आहे.









