वृत्तसंस्था/ रोम
पुढील आठवड्यात येथे सुरु होणाऱ्या इटालीयन खुल्या पुरुष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेतून झेकची महिला टेनिसपटू पेत्रा क्विटोव्हाने दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
झेकच्या 10 व्या मानांकित क्विटोव्हाच्या उजव्या पायाच्या तळव्याला ही दुखापत झाली आहे. या दुखापतीवर वैद्यकिय इलाज सुरु आहे. गेल्याच महिन्यात क्विटोव्हाने मियामी टेनिस स्पर्धा जिंकली होती. रोममधील इटालियन टेनिस स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होणार असून ही स्पर्धा 20 मे पर्यंत चालणार आहे.









