► वृत्तसंस्था / लंडन
2011 आणि 2014 च्या विजेत्या पेत्र क्विटोव्हाला या वर्षीच्या स्पर्धेसाठी बुधवारी वाईल्ड कार्ड देण्यात आल्यानंतर ती विम्बल्डनमध्ये परतत आहे. क्विटोव्हा ग्रासकोर्ट ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत 2023 मध्ये शेवटची खेळली होती आणि गेल्या वर्षीच्या तिचा मुलगा जन्माला आल्यानंतर ती पहिल्यांदाच आई बनली. 17 महिने कोर्टपासून दूर राहिल्यानंतर फेब्रुवारीमध्ये टेक्सासमधील ऑस्टिन येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूरमध्ये क्विटोव्हाने पुनरागमन केले आणि सध्या ती 572 व्या क्रमांकावर आहे. झेक प्रजासत्ताकची क्विटोव्हा ही बुधवारी मुख्य ड्रॉमध्ये एकेरी वाईल्ड कार्ड मिळवणारी एकमेव गैर ब्रिटीश खेळाडू होती. महिला ड्रॉसाठी वाईल्ड कार्ड मिळालेल्या इतर सात खेळाडूंमध्ये ब्रिटीश खेळाडू हीदर वॉटसन, हॅरिएट डार्ट आणि जोडी बुरेज यांचा समावेश आहे. तर पुरुष ड्रॉसाठी वाईल्ड कार्ड मिळालेल्या सात ब्रिटीश खेळाडूंमध्ये डॅन इव्हान्सचा समावेश आहे. योग्यवेळी आणखी इक पुरुष वाईल्ड कार्ड जाहीर केले जाईल, असे आयोजकांनी सांगितले.









