बॉलिवूडमध्ये सत्यघटनांवर अनेक चित्रपट तयार झाले आहेत. दिग्दर्शक शुवेंद राज घोष एका सत्यघटनेवर चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘कुसुम का बियाह’ असून तो लॉकडाउनदरम्यान घडलेल्या घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रदीप चोप्रा आणि बलवंत पुरोहित यांनी केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. या चित्रपटात सस्पेन्सही दिसून येणार आहे. हा चित्रपट 21 जुलै रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कोरोना काळातील लोकांना तोंड द्यावे लागलेल्या अडचणी मोठ्या पडद्यावर दर्शविणारा आहे. कोरोना महामारीमुळे सरकारने लॉकडाउन लागू केले होते, यामुळे अनेक लोक अडकून पडले होते. बिहारमधून झारखंड येथे गेलेली विवाहाची वरात यादरम्यान अडकून पडली होती. याच घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. दोन राज्यांच्या सीमेवर कुसुमची वरात अडकून पडली होती. चित्रपटातील मुख्य भूमिकेत सिक्कीमची सुजानी दर्जी आणि लवकेश गर्ग दिसून येणार आहे.
Previous Articleदोन बसच्या अपघातात ओडिशात 12 ठार
Next Article पीओके हा भारताचाच हिस्सा : राजनाथ सिंह
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









