► वृत्तसंस्था / अबुधाबी
एफआयए कन्स्ट्रक्टर्स विश्व फॉर्म्युला-2 मोटार चॅम्पियशीप स्पर्धेत येथे भारतीय चालक कुश मैनीने विजेतेपद मिळवून मोटार रेसिंग क्षेत्रात नवा इतिहास घडविला.
रविवारी झालेल्या या शर्यतीमध्ये भारतीय चालक कुश मैनीने आपला प्रतिस्पर्धी कॅम्पोसला 34.5 गुणांनी मागे टाकत विजेतेपद पटकाविले. या शर्यतीमध्ये मैनीने पोल पोझीशन मिळविले होते.









