कुपवाड/प्रतिनिधी
कुपवाडमधील सोसायटी चौकात मेडिकलसमोर लावलेली मिरजेतील एका वकिलांची मोटारसायकल अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत कुपवाड पोलीसांत नोंद झाली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ॲड.अमित लक्ष्मण बनसोडे (रा.गुरुवार पेठ,मिरज ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. बनसोडे यांची ५० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल (एम.एच.१०, सी.जे. ७२५३) चोरट्यांनी लंपास केली आहे. ते काही कामानिमित्त मंगळवारी दुपारी कुपवाडमध्ये आले होते. औषधे घेण्यासाठी एका मेडिकल दुकानात गेले असता यावेळी चोरट्यांनी त्यांची मोटारसायकलची चोरी करून पळ काढला. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.








