Kunkeri School No. 1 Merit Ceremony concluded with enthusiasm
कुणकेरी प्राथमिक शाळा क्रमांक 1 मध्ये वार्षिक विद्यार्थी गुणगौरव समारंभ व बक्षीस वितरण समारंभ पार पडला . यावेळी मुलांचे हस्तलिखित अळंबी पुस्तकाचे प्रकाशन यावेळी प्रमुख पाहुणे देवरुख आर्ट कॉलेजचे प्राचार्य रणजीत मराठे व कॅप्टन दीपक परब यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी श्री मराठे व परब यांनी आता गावागावातील मराठी शाळा प्राथमिक शाळा टिकवायच्या असतील तर माजी विद्यार्थ्याने माझी शाळा माझी जबाबदारी यानुसार भूमिका घेतली तर निश्चितपणे गावातील प्राथमिक शाळा पुन्हा बहरतील असे स्पष्ट केले . कुणकेरी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला . बक्षीसांची खैरातही झाली त्यामुळे खऱ्या अर्थाने या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक गुणवंत आहेत असे कौतुकही उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी व्यासपीठावर कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड संतोष सावंत , मराठी अध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष भरत गावडे , ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा अध्यक्ष सुभाष गोवेकर, शिक्षणतज्ञ सूर्यकांत सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजन मडवळ, मुख्याध्यापक विठ्ठल कदम ,सरपंच सोनिया सावंत ,सुनील परब ,कैलास परब, जितेश कुंडकेरकर ,अंकिता जोशी ,अनुराधा गावडे ,नागेश गावडे, पांडुरंग परब , आधी उपस्थित होते . यावेळी सादर केलेल्या कलागुणांचे कौतुक तसेच विशेष म्हणजे चित्रकार वृक्षमित्र ग्रंथ मित्र लेखन मित्र असे विविध पुरस्कार विद्यार्थ्यांना देऊन त्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला . यावेळीॲड संतोष सावंत, भरत गावडे , सुभाष गोवेकर सूर्यकांत सावंत, सरपंच श्रीमती सावंत, यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अळंबी हे हस्तलिखित पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले .
सावंतवाडी / प्रतिनिधी









