मंजूर ट्रान्सफॉर्मर तात्काळ न बसवल्यास १५ ऑगस्ट रोजी उपोषण
ओटवणे | प्रतिनिधी
कुणकेरी गावात कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे कुणकेरीवासीय पुरते हैराण झाले आहेत.ट्रान्सफॉर्मर मंजूर असूनही तो बसवण्यास टाळाटाळ केली जात आहे. याबाबत कुणकेरीवासियांनी महावितरणचे अनेक वेळा लक्ष वेधले मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कुणकेरी गावात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. याचा फटका ग्राहकांसह सर्व दुकानदार लघुउद्योजक यांना बसत आहे.यावेळी ग्रामस्थानी कुणकेरी वासियांना कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांचा पाढाच उपअभियंता शैलेंद्र राक्षे यांच्यासमोर वाचला. यावेळी येत्या १० दिवसात विजेच्या समस्या सोडविण्याबाबत ठोस कार्यवाही न केल्यास सावंतवाडी कार्यालयासमोर येत्या १५ ऑगस्ट रोजी उपोषण छेडण्याचा इशारा कुणकेरी ग्रामस्थांनी दिला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, मंगेश सावंत, भरत उर्फ भाऊ सावंत, विनायक सावंत, विश्राम उर्फ बाळा सावंत, अभिजीत सावंत, मनोज घाटकर, दादा खडपकर, एकनाथ सावंत, महादेव गावडे, विनोद सावंत, बाळकृष्ण सावंत, संदेश सावंत, सहदेव घाटकर, सिताराम सावंत, नरेश परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.









