ऑनलाईन टीम / तरुण भारत :
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. कधी दोन गटातील राडय़ासाठी तर कधी एकतर्फी प्रेमासाठी कोयता उगारला जात आहे. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात एक तरुण कोयता काढून दहशत निर्माण करत होता. पोलिसांनी या तरुणाचा माज उतरविण्यासाठी त्यांची कॉलेजमधून डेक्कन परिसरात धिंड काढली.
कुणाल कानगुडे (19 वर्षे) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी कुणालचे आबासाहेब गरवारे महाविद्यालयात डॅनी नावाच्या तरुणाशी वाद झाले होते. त्यानंतर कॉलेजमध्ये दहशत राहावी म्हणून तो बॅगमध्ये कोयता घेऊन येत होता. कॉलेजमध्ये कोयता काढून दहशत माजवायचा. पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कॉलेजमधील सीसीटीव्ही तपासून त्याला अटक करुन त्याची कॉलेजमधून डेक्कन परिसरात धिंड काढली.









