वार्ताहर /पणजी
पुणे महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचा सन 2021 चा ज्ये÷ संपादक व लेखक रा. अ. कुंभोजकर स्मृती पुरस्कार यावषी गोव्यातील दैनिक नवप्रभाचे संपादक व लेखक श्री. परेश वासुदेव प्रभू यांना जाहीर झाला आहे. मराठी साहित्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱया, सृजनशील लेखन करणाऱया पत्रकार संपादकास, ज्ये÷ संपादक व लेखक रा. अ. कुंभोजकर यांच्या स्मृत्यर्थ या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
श्री. प्रभू यांची आजवर ’गोमंतकीय मराठी पत्रकारितेचा इतिहास’, ’गोपालकृष्ण भोबे ः चरित्र आणि साहित्य’, ’बाकी संचित’, ’निरंजन’, अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कविवर्य शंकर रामाणी यांच्या पत्रसंग्रहाचे ’एकटय़ाचे गाणे’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.
पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था गेली 116 वर्षे मराठी भाषा, साहित्य, समीक्षा व संस्कृती यांच्या जतनासाठी कार्यरत आहे. संस्थेचा 116 वा वर्धापनदिन सोहळा येत्या दि. 26 व दि. 27 मे असे दोन दिवस पुण्यात साजरा होणार असून दि. 26 रोजी पुण्याच्या एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान होणाऱया कार्यक्रमात ख्यातनाम हिंदी साहित्यकि अशोक वाजपेयी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे असतील. कार्यक्रमाला परिषदेच्या वि श्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आदींची उपस्थिती असेल.









