प्रा.एस.पी. चौगले
वाकरे,प्रतिनिधी
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी नरके पॅनलचे प्रमुख कारखान्याचे चेअरमन माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनलने सर्वच्या सर्व 23 जागा जिंकून सलग चौथ्यांदा कारखान्याची सत्ता अबाधित ठेवली.आमदार पी.एन.पाटील,आमदार विनय कोरे आणि बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव मंच आघाडीचे या निवडणुकीत पानिपत झाले.
विरोधी शाहू आघाडीला पाठिंबा दिलेले गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके,संदीप नरके आणि चेतन नरके या निवडणुकीत निष्प्रभ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.रविवार दि. 12 रोजी 82.45 टक्के मतदान झाले होते. मंगळवारी सकाळी 8 वाजता बहुउद्देशीय हॉल कसबा बावडा येथे मतमोजणीस प्रारंभ झाला.बुधवारी पहाटे तीन वाजता संपूर्ण निकाल जाहीर करण्यात आला.तब्बल 19 तास मतमोजणीचे काम सुरू होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी काम पाहिले. प्रदीप मालगावे यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले. उत्पादक गटातील सर्व उमेदवार 468 पासून 1372 मताधिक्याने विजयी झाले.
सत्ताधारी नरके पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
उत्पादक सभासद गट क्रमांक 1
अनिल रावसो पाटील (वाकरे) -10254
भगवंत भीमराव पाटील ( वाकरे) 10138
बाजीराव सदाशिव शेलार (कुडित्रे) 10099
उत्पादक सभासद गट क्रमांक 2
राहुल विश्वनाथ खाडे (सांगरूळ) 10374
उत्तम पांडुरंग वरुटे (कसबा बीड) 10285
किशोर आनंदा पाटील (शिरोली दुमाला) 10162
दादासो अर्जुना लाड (गणेशवाडी) 10265
सर्जेराव दिनकर हुजरे (महे ) 9475
उत्पादक सभासद गट क्रमांक 3
संजय बळवंत पाटील (खुपिरे) 10330
सरदार आनंदा पाटील (पाडळी खुर्द) 10245
विश्वास दत्तात्रय पाटील (कोगे) 10314
उत्पादक सभासद गट क्रमांक 4
बळवंत दादू पाटील-करचे (यवलुज) 9811
अनिष जयसिंगराव पाटील (कसबा ठाणे) 10579
प्रकाश दौलतराव पाटील (तिरपण) 10303
उत्पादक गट क्रमांक 5
चंद्रदीप शशिकांत नरके (बोरगाव) 11379
प्रकाश दत्तात्रय पाटील (पाटपन्हाळा) 10530
वसंत श्रीपती आळवेकर (तांदूळवाडी) 9996
राऊ गुंडू पाटील (पणूत्रे,) 9895
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी
कृष्णात दत्तू कांबळे (कोगे) 10678
महिला प्रतिनिधी
धनश्री प्रकाश पाटील (आमशी) 10349
प्रमिला जयवंतराव पाटील (पडळ) 10053
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
विलास आनंदा पाटील (कोपार्डे) 10273
भटक्या विमुक्त जाती जमाती
युवराज श्रीधर शिंदे (वरणगे)10473
विरोधी राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलचे उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :
उत्पादक सभासद गट क्रमांक 1
शिवाजी तुकाराम तोडकर (वाकरे) 8562
एकनाथ चित्रापा पाटील (कुडित्रे) 8245
युवराज कृष्णात पाटील (कोपार्डे) 7988
उत्पादक सभासद गट क्रमांक 2
बाजीराव नानासो खाडे (सांगरूळ) 8584
परशराम राजाराम पाटील (बहिरेश्वर) 7749
बुद्धीराज शंकर पाटील (महे ) 8018
सरदार शिवाजी पाटील (शिरोली दुमाला)7719
राजेंद्र गुंडाप्पा सूर्यवंशी (कसबा बीड) 9007
उत्पादक गट क्रमांक 3
आनंदराव कृष्णा पाटील (खुपिरे) 8470
बाजीराव दौलू पाटील (कोगे) 8142
सर्जेराव जोती पाटील (खुपिरे) 7736
उत्पादक गट क्रमांक 4
शशिकांत शामराव आडनाईक (यवलुज) 8305
स्नेहदीप बाजीराव पाटील (कसबा ठाणे) 8278
सरदार रामचंद्र बाडे (पुनाळ) 7810
उत्पादक गट क्रमांक 5
आनंदा धोंडीराम चौगले (हरपवडे) 7563
प्रकाश पांडुरंग देसाई (देसाईवाडी) 8202
नानासो चिमाजी पाटील (पाटपन्हाळा) 7428
विलास दगडू बोगरे (सुळे) 7753
अनुसूचित जाती जमाती
हिंदुराव श्रावणा कांबळे (हिरवडे दुमाला) 7911
महिला प्रतिनिधी
राजश्री सुभाष पाटील (वाकरे) 8336
स्नेहल उत्तम पाटील (शिंगणापूर) 8511
Previous Articleजुनी पेन्शन योजना लागू केल्याचा अध्यादेश कधी ?
Next Article सातारा पॅसेंजर मिरजेतून कोल्हापूरला धावणार









