सातारा स्थानिक राजकारणात नव्या घडामोडी
पाटण : ढेबेवाडी परिसरात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. सळवे गावातील कुंभारवाडी यांनी देसाई गटाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश भाजपा राज्य परिषद सदस्य सत्यजितसिंह पाटणकर व याज्ञसेन विक्रमसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली झाला.
या प्रसंगी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना भाजपा ओळखपत्र आणि भगवा फेटा प्रदान करण्यात आला. यावेळी विभागातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









