रत्नागिरी :
जिल्ह्यात खरिपातील भात कापणीनंतर जमिनीच्या अंगभूत ओलाव्यावर कुळीथ पिकाची लागवड 882.69 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे जमिनीतील ओलावा चांगला टिकून राहिल्याने पीक चांगले आले आहे. किलोला 70 ते 80 ऊपये दर मिळत असला तरी यावर्षी 100 ऊपये दर मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पाण्याअभावी जिल्हयातील रब्बी हंगामातील पीक क्षेत्र कमी आहे. तृणधान्य, कडधान्य, भाजीपाला, गळीतधान्य मिळून एकूणच लागवड पाच हजार 114.42 हेक्टर क्षेत्रावर आहे. खरिपातील भात कापणीनंतर जमिनीच्या अंगभूत ओलाव्यावर कुळीथ पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. 882.69 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती.
- कुळीथ काढणीला जोर
साडेतीन महिन्यांत पीक तयार होते. या पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता भासत नाही. शिवाय विशेष परिश्रमही लागत नसल्यामुळे सर्रास कुळीथ लागवड शेतकरी करत आहेत. कुळीथ पीक तयार झ्ल्यामुळे काढणी सर्वत्र जोरात सुरू आहे. एकाचवेळी पीक तयार झाल्याने मजूरांचा प्रश्न उभा ठाकला आहे.








