प्रतिनिधी/ धारबांदोडा
कुळे-शिगांव येथील श्री सातेरी देवीचा अकरावा वर्धापनदिन सोहळा आज रविवार 23 व सोमवार 24 एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानिशी साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त रविवार 23 रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी 1 वा महाआरत्या, सामुहिक गाऱ्हाणे, महाप्रसाद होईल. रात्री 9 वा. ‘आता करपाचे कितें’ नाट्याप्रयोगाचे सादरीकरण होईल. सोमवार 24 रोजी दिवजोत्सव त्यानंतर रात्री 9 वा. ‘भविष्यमान भव’ हा कोकणी नाटयप्रयोग सादर होईल. भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.









