वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाज कुलदीपने वनडे क्रिकेट प्रकारात सर्वात जलदगतीने 150 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. त्याने हा विक्रम फक्त 88 सामन्यातून पूर्ण केला आहे. यापूर्वी हे रेकॉर्ड अब्दुल रजाकच्या नावे होता. त्याने 108 एकदिवसीय सामन्यातून हे रेकॉर्ड केले होते. भारतीय टीममध्ये कुलदीप 150 बळी जलदरित्या टिपणारे दुसरा गोलंदाज आहे. तर पहिल्या स्थानी मोहम्मद शमी आहे. त्याने 80 सामन्यांतून हे स्थानी झेप घेतली होती.
नुकत्याच झालेल्या श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात 9.3 षटकारमध्ये 43 धावा देऊन 4 विकेट घेतल्या. अन् सामना फिरवला, भारताने मोठ्या फरकारने विजय मिळविला. तसेच यापूर्वीच्या पाकिस्तानविरोधातील सामन्यातही कुलदीपने आपल्या फिरकीच्या जादूने 5 विकेट घेऊन ऐतिहासिक मोठ्या फरकाने विजय मिळविला. या खेळीने उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्यांमध्ये कुलदीपने वनडे क्रिकेट प्रकारात सर्वात जलदगतीने 150 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. त्याने हा विक्रम फक्त 88 सामन्यातून पूर्ण केला आहे. यापूर्वी हे रेकॉर्ड अब्दुल रजाकच्या नावे होता. त्याने 108 एकदिवसीय सामन्यातून हे रेकॉर्ड केले होते.
एकूण फिरकी गोलंदाजामध्ये 150 बळी घेणारे…
एकूण फिरकी गोलंदाजांमध्ये 150 बळी जलदगतीने टीपणाऱ्यांमध्ये कुलदीप चौथ्या स्थानी आहे. यात अव्वलस्थानी पाकिस्तानचा सकलेन मुश्ताक असून त्याने 78 सामन्यात 150 बळी टिपले होते. दुसऱ्यास्थानी अफगाणचा रशिद खान याने 80 तर श्रीलंकाच्या अजंता मेंडिसने 84 सामन्यात हे रेकॉर्ड करुन तिसऱ्या स्थानी आहे. व कुलदीप 88 सामन्यांद्वारे चौथ्या क्रमांकावर आहे.
एकदिवसीय सामन्यात उजव्या हाताने 150 बळी टिपणारे फिरकी गोलंदाज
कुलदीप यादव 88
अब्दुल रजाक 108
ब्रैड हॉग 118
शकिब अल हसन119
रवींद्र जेडजा 129









