वार्ताहर/कुद्रेमनी
सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव तालुका क्षेत्र उचगाव विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत द.म. शि. मंडळ संचलित कुद्रेमनी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवून सर्वसाधारण जेतेपद मिळविले. विजेत्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे.शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी खेळाडूंनी सांघिक व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, रिले खेळ प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. वैयक्तिक खेळात गोळाफेक गणेश राजगोळकर प्रथम, हॅमर थ्रो द्वितीय, लांब उडी ऋषभ पाटील प्रथम, तिहेरी उडी द्वितीय, चालणे महांतेश पाटील प्रथम, रोहन बडसकर भालाफेक द्वितीय, 800 मी. धावणे श्रेयश गुरव द्वितीय, थाळीफेक समर्थ पाटील प्रथम, नैतिक यळ्ळूरकर 40 मी. प्रथम, श्रावणी पाटील थाळीफेक प्रथम, तिहेरी उडी द्वितीय, आरुसी जांबोटकर थळीफेक, हॅमर थ्रो द्वितीय, अक्षरा कडलगेकर हॅमर थ्रो प्रथम, सानिका बडसकर भालाफेक प्रथम, जोतिबा यळ्ळूरकर 100 मी. धावणे, पायल पन्हाळकर-उंच उडी, समिक्षा मुरकुटे हर्डल 100 मी., रविनाथ गोवेकर धावणे, स्वप्नील नाईक लांबउडी व इतरांनी क्रमांक मिळविला. शाळा सुधारणा समिती मंडळ, शिक्षक, क्रीडा शिक्षक, शाळेचे माजी खेळाडू, विद्यार्थी यांचे खेळाडूंना प्रोत्साहन लाभले.









