बेळगाव :
निडसोशी, ता. हुक्केरी येथील सिद्ध संस्थान मठाचे जगद्गुरु श्री पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजींना येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाने मानद डॉक्टरेट बहाल केली आहे. या पार्श्वभूमीवर हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी शनिवारी बेळगाव विमानतळावर त्यांचा गौरव केला. यावेळी रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण, गुरुमितकलचे आमदार शरणगौडा पाटील उपस्थित होते. कामानिमित्त निडसोशी स्वामीजी बेंगळूरला निघाले होते. त्यावेळी विमानतळावर हुक्केरी मठाधीशांनी त्यांचा गौरव केला. दक्षिणेत जसे सिद्धगंगा मठ, सुत्तूर मठ आहेत तसे उत्तर कर्नाटकात निडसोशीचा सिद्ध संस्थान मठ अस्तित्वात आहे. श्री पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजींनी समाजातील सर्व घटकांबरोबर मिळून काम केले आहे. त्यांना डॉक्टरेट मिळाली याचा साऱ्यांनाच आनंद झाला आहे, असे हुक्केरी मठाधीशांनी सांगितले.









