वृत्तसंस्था/ डोहा
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या डोहा खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या 25 वर्षीय व्हेरोनिका कुडेरमेटोव्हाने अमेरिकेच्या कोको गॉफला पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरी गाठली. आता कुडेरमेटोव्हा आणि पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक यांच्यात उपांत्य लढत होणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कुडेरमेटोव्हाने कोको गॉफचा 6-2, 3-6, 6-1 अशा सेटस्मध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. जेसिका पेगुलाने बेट्रीज हेदाद मेयाचा 6-3, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. मारिया सॅकेरीने फ्रान्सच्या कॅरोलिना गार्सियावर 6-2, 6-7(5-7), 7-6(7-5) अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळवले. पोलंडच्या इगा स्वायटेकने केवळ 50 मिनिटांच्या कालावधीत अमेरिकेच्या डॅनिली कॉलीसचा सरळ सेटस्मध्ये फडशा पाडला.









