वार्ताहर कुडाळ
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभागीय कार्यालय ठाणे, गट कार्यालय, चिपळूण तर्फे आयोजित करण्यात आलेल्या गटस्तरीय समरगीत स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र,कुडाळ संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. या संघाची 9 ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सिंधुदुर्ग, रायगड व रत्नागिरी जिल्हा मधून 11 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा उर्वरीत निकाल :- द्वितीय – कामगार कल्याण केंद्र (मालवण), तृतीय -कामगार कल्याण केंद्र, (सावंतवाडी), उत्तेजनार्थ प्रथम- कामगार कल्याण केंद्र, (कुडाळ), कामगार वसाहत (पिंगुळी), उत्तेजनार्थ द्वितीय-कामगार कल्याण केंद्र (पोफळी) यांनी मिळविला.या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षा अक्षता खटावकर व महावितरण कंपनी मर्यादीत विभागीय कार्यालय कुडाळचे उपव्यवस्थापक निलेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.यावेळी कार्यलक्षी व्यवस्थापक व कुडाळ तालुका खरेदी विक्री संघ संचालक नंदकिशोर करावडे, कामगार कल्याण अधिकारी गट कार्यालय चिपळूण अधिकारी अरुण लाड, कामगार कल्याण केंद्र संचालक महाड दीपक गायकवाड,गट कार्यालय चिपळूण लिपिक सीताराम पालव, अर्धवेळ केंद्र सेवक अमोल तलावडेकर, परीक्षक निलेश मेस्त्री, किशोर सावंत, मंजिरी धोपेश्वरकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.









