वार्ताहर / कुडाळ
क. म. शि. प्र. मंडळाच्या, कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजने एस. एल. देसाई पाट हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या मुला-मुलींच्या दोन्ही संघानी विजयी होऊन 19 वर्षाखालील वयोगटात शालेय जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले. या संघाची निवड विभागस्तरावर झाली आहे.
कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कुडाळ यांनी एस. एल. देसाई पाट येथे झालेल्या 19 वर्षाखालील शालेय जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या संघाने मालवण तालुक्यातील पोईप हायस्कूल संघाचा 2-0 सेट अशा फरकाने तर मुलांच्या संघाने अतितटीच्या लढतीत कणकवली तालुक्यातील कणकवली कॉलेज चा 2-1 च्या सेटने दणदणीत पराभव करीत विजय मिळविला.
कुडाळ हायस्कूलच्या विजेत्या मुलांच्या संघात कर्णधार – सोमाजी संतोष कोरगावकर, उपकर्णधार- आर्यन प्रेमानंद जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली अक्षय दत्तात्रय मोहिते, अर्थव संजय पाटकर, आराध्य मधुकर चव्हाण, ओम विशांत वाडेकर, गंगाराम पांडुरंग भाईप, गौरव गिरीश राऊळ, मृणाल मोहन राऊळ, चेतन पांडुरंग तांडेल, प्रित आंतोन अल्मेडा, साहिल गुरुनाथ कानडे यांनी चांगली कामगिरी केली.
तसेच मुलींच्या संघात कर्णधार- मयुरी गणपत तळवणेकर, उपकर्णधार- श्रावणी संदिप धुरी यांच्या नेतृत्त्वाखाली मालीनी बाबुराव वारंग, वैदेही विजय ठाकुर, तन्वी प्रविण लुडबे, तेजल योगेश पिंगुळकर, निकीता साबाजी कुबल, पौर्णिमा बाबुराव वारंग, भूमिका संतोष सातार्डेकर, सानिका अनिल पिंगुळकर, स्मृती रघुनाथ पिंगुळकर, तन्वी धोंडी वायंगणकर यांनी चांगली कामगिरी केली.या खेळाडूना प्रशालेचे क्रीडा शिक्षक विजय मयेकर, वैभव कोंडसकर, रामचंद्र खाकर सचिन पाताडे, सिध्दार्थ बावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील विजेत्या मुला- मुलींचे संस्था पदाधिकारी अविनाश तळेकर, अनंत वैद्य, का. आ. सामंत, अरविंद शिरसाट, सुरेश चव्हाण, मुख्याध्यापक दिनेश आजगावकर, उपमुख्याध्यापक महेश ठाकुर, ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्य राजकिशोर हावळ, पर्यवेक्षक शेषकुमार नाईक, प्रविण भोगटे शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले.









