बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेने बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना यांच्यावरील बंदी हटवून बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेला पुढील कार्यसाठी क्लीन चिट दिली. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेला आर्थिक व इतर बाबतीतसाठी बंदी घालण्यात आली होती.त्यावर अॅडॉप्ट कमिटी नेमली, कर्नाटक फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी व बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बैठक होऊन.केएसएफए कमिटीने सर्व बाबी विचारात घेऊन त्यावर त्यांनी पडताळनी केली. बिडीएफएने आर्थिक पावतीसह अचूक सादर केला केएसएफएने बैठक घेतली.
कर्नाटक फुटबॉल संघटनेने बेळगावच्या अॅडॉप्ट कमिटीसह बैठक घेतली. या बैठकीत कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष शकीलअब्दुल रहमान, इस्माईल, प्रमुख सचिव एम कुमार, खजिनदार श्रवण धर्मन्न, बी के मुनीर, प्रशांत देवदानम व रवी चौगुले यांच्यात बैठक झाली. या बैठकीत कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेने बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेने केलेले कार्य व त्यांनी दिलेला तपशील हिशोब या सर्व बाबी लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेला बंदी उठून त्यांना क्लीन चीट देण्यात आली. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेने आपले कार्य त्वरित सुरू करावे व जास्तीत जास्त स्पर्धा भरवाव्यात असे अव्हान करण्यात आले
गोपाळ खांडे, परशराम चौगुले, लुईस डिसोजा, या पदाधिकाऱ्यांनी फुटबॉल संघटना निर्भडपणे चालू ठेवली. त्यानंतर ही संघटना नवोदित तरुण ट्रस्ट फुटबॉलपटूकडे सुपूर्द केली. गेली पंधरा वर्षे पंढरी परब व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही फुटबॉल संघटना चालू ठेवली आहे. पंढरी परब नगरसेवक असताना सुभाष चंद्र बोस लेले मैदानाचे सुलभ गोष्टीची पुरतात केली.मैदानावरती साखळी, आंतर शालेय व महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा भरविल्या जात होत्या.बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेने कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या आदेशानुसार पुढील हंगाम आंतर शालेय, महाविद्यालयीन, वरिष्ठ साखळी, वरिष्ठ अंतरराज्य निमंत्रितांची स्पर्धा, व बाजपद्धतीची स्पर्धा भरवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
शाळा, महाविद्यालयीन,आंतराज्य स्पर्धा भरविण्याठी करणार प्रयत्न-पंढरी परब
1985-1986 दरम्यान बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना लुईस पोल आणि गोपाळ खांडे आणि इतर सीनियर मेंबर यांनी सुभाष चंद्र बोस मैदान स्थापना केली. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या धुरा युवकांकडे सोपवण्यासाठी एक संधी दिली त्यानुसार हि फुटबॉल स्पर्धा अंखडित चालू आहे. त्याला लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे बळ मिळाले आहे. त्यांनी हि स्पर्धा भरविण्यासाठी मोलाच वाटा उचलला आहे.पुढील काळात अत्याधुनिक मैदान बनवुन देण्यासाठी शासनाकडून प्रयत्नशिल रहाणार आहेत.









