निल पवार सामनावीर, अशुतोष हिरेमठच्या सर्वाधिक धावा
बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या भेदक गोलंदाजाच्या जोरावर अंतिम फेरीत हुबळी क्रिकेट अकादमी संघाचा 8 गड्यांनी पराभव करून 16 वर्षाखालील केएससीए आंतर क्लब चषक पटकाविला. अष्टपैलू कामगिरी करण्याऱ्या निल पवारला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त, धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित 16 वर्षाखालील केएससीए चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना हुबळी क्रिकेट अकादमीने 39.3 षटकात सर्वगडी बाद 98 धावा केल्या. त्यात अदित्य खिलारेने 4 चौकारासह 30, कृष्णा पाहुजाने 2 चौकारासह 18, महमदमोन मुल्लाने चौकाराहसह 12 धावा केल्या. बेळगाव स्पोर्टस क्लब तर्फे निल पवारने 12 धावांत 4, सागर पाटीलने 17 धावांत 2, सुरेंद्र पाटीलने 21 धावात 2 तर अर्नव कुंदपने एक गडीबाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्टस क्लब संघाने 34 षटकात 2 गडीबाद 99 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकत केएससीए चषक पटकाविला. त्यात निल पवारने 4 चौकारासह 28, अशुतोष हिरेमठने 5 चौकारासह 26, सुरेंद्र पाटीलने 4 चौकारासह 25 धावांचे योगदान दिले. हुबळीतर्फे अमय देसाई व अक्षय बाचीवाल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. सामन्यानंतर बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार, कार्याध्यक्ष दीपक पवार, संगम पाटील, विवेक पाटील, प्रमोद असलकर, स्वप्नील ऐळवे, विजय पाटील, सोमनाथ सोमण्णाचे यानी यासंघाचे अभिनंदन केले. या स्पर्धेत अशुतोष हिरेमठने 340 धावा करून सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळविला.









