कोल्हापूर :
डिसेंबर महिन्यापासून ते अगदी मे 2025 पर्यंत अखंडपणे सुरु राहणाऱ्या कोल्हापूरी फुटबॉल हंगामासाठी केएसएच्या वतीने गुरुवारी वरिष्ठ फुटबॉल संघ व खेळाडू नोंदणी कार्यक्रमाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी नोंदणीला प्रतिसाद देत 16 पैकी तब्बल 14 संघांनी आपली नोंदणी केली. तसेच 7 संघांकडून 87 खेळाडूंचीही नोंदणी करण्यात आली. केएसएकडून ऑनलाईन पद्धतीने नेंदणी करवून घेण्यात येत आहे.
केएसएचे सचिव माणिक मंडलिक यांच्या हस्ते वरिष्ठ फुटबॉल संघ व खेळाडू नोंदणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी संभाजी मांगोरे–पाटील, विश्वंभर मालेकर, मनोज जाधव, दीपक घोडके आदी उपस्थित होते. यानंतर सलग दोन तास सुऊ राहिलेल्या नोंदणी कार्यक्रमात 14 संघांच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शाहू स्टेडियममधील केएसए कार्यालयात दाखल होऊन आपआपल्या संघांची नोंदणी केली. तसेच खंडोबा तालीम मंडळाकडून 17, वेताळमाळ तालीम मंडळाकडून 16, वर्षाविश्वास तऊण मंडळाकडून 15, शिवाजी तऊण मंडळाकडून 14, पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघाकडून 13, दिलबहार तालीम मंडळाकडून 10 आणि प्रॅक्टीस फुटबॉल क्लबकडून 2 खेळाडूंची नेंदणी करण्यात आली.








