गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने नागठाणे परिसरातील शिवार जलमय झाले आहे.पलूस तालुक्यात आज सकाळपासून पावसचा जोर ओसरला असला तरी कृष्णा नदी ओसंडून वाहत असून पाणी नदीच्या पात्राबाहेर पडत आहे. गेल्या चोवीस तासात नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला आहे. पाणी पातळीत २.५ फुटांची वाढ झाली आहे. आज सकाळी 9.30 वाजता नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला असून पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे नागठाणे गावाचा शिरगाव नागराळे गावाशी संपर्क तुटला आहे.
अनुचित प्रकार टाळण्यासाठी भिलवडी व आष्टा पोलिस स्टेशनच्या वतीने बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.यावेळी आष्टा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर पोलिस कॉस्टेबल अभिजित नायकवडी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी ग्रामसेवक ए डी पवार,तलाठी निहाल अत्तार,पोलिस पाटील दिपक कराडकर व ग्रांमपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








