ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असताना कार (Car) आणि ट्रकचा (Truck) अपघात होऊन ५ जण ठार झाले आहेत. सोलापूर (Solapur) कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ (Krushi Utpanna Bazar Samiti) हा अपघात झाला आहे. कारमध्ये ९ जण होते. चालकाला डुलकी लागली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. सोलापूर- हैदराबाद (Solapur-Hyderabad National Highway) महामार्गावर ट्रक थांबला होता. भरधाव वेगाने आलेल्या कारणे थांबलेल्या ट्रकला चारचाकीने मागून जोरात धडक दिली.
ट्रक आणि कारच्या अपघातात (Accident) ५ जणांचा मृत्यू झाला, तर ४ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात (hospital) उपचार सुरु आहेत. हुबळी येथील शितोळे कुटुंबीय मिरज येथील नातेवाईक जाधव यांच्या मिरजेतील (Miraj) घरी गेले होते. एकूण नऊ जण कार मधून प्रवास करत होते. ते रात्री इनोव्हा गाडीतून पंढरपूर (Pandharpur) येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते दुपारच्या सुमारास अक्कलकोटला निघाले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ आली असता कार चालकाला डुलकी आल्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रक ला मागून जाऊन धडकल्याने यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू तर ४ जण गंभीर जखमी झाले आहे.
दुपारच्या सुमारास महामार्गावर एका बाजूला थांबलेल्या ट्रकला इनोव्हाने मागून जोरात धडक दिली. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोक लगेचच तेथे दाखल झाले. पोलिसही काही वेळात त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी खमींना बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.