राघव जुयाल अन् धैर्य कारवा देखील मुख्य भूमिकेत
करण जौहरने स्वत:ची नवी वेबसीरिज ‘ग्यारह ग्यारह’साठी ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. दोघांचेही प्रॉडक्शन हाउस एकत्र येत सस्पेंस अन् थ्रिलने युक्त या सीरिजची निर्मिती करतील. 23 मे रोजी या सीरिजचा टीझर जारी करण्यात आला आहे.

ग्यारह ग्यारह एक इन्व्हस्टिगेटिव्ह फॅन्टसी ड्रामा सीरिज असून ती झी5 वर स्ट्रीम होणार आहे. या सीरिजमध्ये धैर्य कारवा, राघव जुयाल अन् कृतिका कामरा मुख्य भूमिकेत आहे. सीरिजमध्ये एकाचवेळी तीन वेगवेगळ्या दशकांची कहाणी दर्शविली जाणार आहे. गुनीत मोंगा यांना अलिकडेच एलिफंट व्हिस्परर्स या लघूपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
या सीरिजचे दिग्दर्शन उमेश बिष्ट करणार आहेत. तर सीरिजची कहाणी पूजा बॅनर्जी आणि संजय शेखर यांनी लिहिली आहे. ग्यारह ग्यारहमध्ये राघव जुयाल अत्यंत वेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहे. राघवने टीव्हीच्या जगतातून स्वत:च्या कारकीर्दीस सुरुवात केली होती. तर कृतिका कामराने देखील आता स्वत:च्या अभिनयाच्या बळावर मनोरंजन क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. काही चित्रपटांसोबत ती आता ओटीटीवर सातत्याने झळकू लागली आहे.









