‘ब्ल्यू बटरफ्लाइ फिल्म्स’ प्रॉडक्शन कंपनी
क्रीति सेनॉन आता निर्माती म्हणून स्वत:ची कारकीर्द सुरू करणार आहे. अभिनेत्रीने यासंबंधीची अधिकृत घोषणा करत स्वत:च्या प्रॉडक्शन हाउसचे नाव जाहीर केले आहे. या चित्रपटसृष्टीत मी 9 वर्षांपासून स्वत:च्या स्वप्नांना पूर्ण करत आहे. यादरम्यान अनेक छोटी-छोटी पावले उचलत शिकत गेले. अनेक गोष्टी आत्मसात करून अभिनेत्री झाले, चित्रपटनिर्मितीचा प्रत्येक पैलू अत्यंत पसंत असल्याने मी आता निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार असल्याचे क्रीतिने म्हटले आहे.
मनाला भावणाऱ्या अधिकाधिक कहाण्या जगासमोर मांडण्याची वेळ आली आहे. मोठ्या स्वप्नांसह मी ब्ल्यू बटरफ्लाय फिल्म्स या नावाने प्रॉडक्शन हाऊ सुरू करत असल्याचे तिने म्हटले आहे. क्रीतिने याचबरोबर काजोलसोबतचे एक छायाचित्र शेअर करत ‘दो पत्ती’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाकरता तीन अत्यंत प्रेरणादायी आणि गुणवत्तापूर्ण महिलांसोबत काम करणार आहे. मोनिका ही कहाणी सादर करण्यासाठी नेटफ्लिक्सपेक्षा अधिक चांगले व्यासपीठ दुसरे असूच शकत नसल्याचे तिने स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
क्रीति आणि काजोलने यापूर्वी रोहित शेट्टीचा चित्रपट ‘दिलवाले’मध्ये एकत्र काम केले आहे. काजोलसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्याने क्रीतिने आनंद व्यक्त केला आहे. काजोल सध्या ओटीटीवर अत्यंत सक्रीय आहे. तर क्रीति पहिल्यांदाच ओटीटीवर थेट पदार्पण करणार आहे.