आदिपुरुष चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा सनी सिंह स्वत:च्या अभिनयासाठी ओळखला जातो. बॉलिवूडमधील उदयोन्मुख कलाकार म्हणून त्याचे नाव घेतले जाते. सनीच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली असून याचे नाव ‘रिस्की रोमियो’ आहे. हा एक कॉमेडी मसाला धाटणीचा चित्रपट असून यात त्याची नायिका म्हणून कृती खरबंदा झळकणार आहे.

या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. हा चित्रपट एक न्यू ऐज जॉनर एपिक कॉमेडी स्वरुपाचा असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अबीर सेनगुप्ता करणार आहे. यापूर्वी त्याने इंदु की जवानी आणि मिसेस अंडरकव्हर या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अबीर सेन यांच्या रिस्की रोमियोच्या मोशन पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता वाढविली आहे.
सनी सिंह आणि कृतीने कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. प्यार का पंचनामा 2 , सोनू के टीटू की स्वीटी आणि आदिपुरुष यासारख्या चित्रपटांमधून सनीने स्वत:च्या अभिनयाची क्षमता पूर्वीच सिद्ध केली आहे. दुसरीकडे कृती खरबंदा ही राज रिबूट, पागलपंती, हाउसफुल4 आणि शादी में जरुर आना या चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. अशा स्थितीत आता रिस्की रोमियो चित्रपटाद्वारे दोन्ही कलाकारांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसून येणार आहे.









