दोडामार्ग – वार्ताहर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा कमिटी नुकतीच स्थापन करण्यात आली या कमिटीच्या सचिव पदी दोडामार्गचे कृष्णा यशवंत धाऊस्कर यांची नेमणूक करण्यात आली.
काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पदाधिकाऱ्यांची यादी प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या परवानगीसाठी पाठवण्यात आली होती. यात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावचे सुपुत्र तसेच पक्षासाठी प्रचंड मेहनत घेणारे कृष्णा ( बाळा ) धाऊस्कर यांची सचिव पदी नेमणूक करण्यात आली. त्यांच्या या नेमणूकीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
फोटो – कृष्णा धाऊस्कर









