वृत्तसंस्था / नवी दिल्ली
झेकची 29 वर्षीय महिला टेनिसपटू तसेच विद्यमान विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम विजेती बार्बोरा क्रेसीकोव्हाने 12 जानेवारीपासून मेलबोर्न येथे सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेतून पाठदुखापतीच्या समस्येमुळे माघार घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून क्रेसीकोव्हाला पाठदुखीच्या समस्येमुळे चांगलेच दमविले आहे. गेल्या वर्षीच्या टेनिस हंगामाध्ये या समस्येमुळे तिला अनेक स्पर्धांमधून आपला सहभाग दर्शविता आला नव्हता. ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने क्रेसीकोव्हाने ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे. गेल्या वर्षी तिने विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा तर 2021 साली तिने फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती.









