वार्ताहर/किणये
पिरनवाडी येथील कबड्डी स्पर्धेत क्रांतिवीर संघ विजेता ठरला आहे. या संघाला राजू बेकवाडकर यांच्याकडून यांच्याकडून 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तर मुळवीर ज्वेलर्स हा संघ उपविजेता ठरला आहे .या संघाला 15000 रुपयाचे बक्षीस अंजली पाटील यांच्याकडून देण्यात आले. ही कबड्डी स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली .या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघानी सहभाग घेतला होता. तृतीय क्रमांक एस. आर. एस. हिंदुस्तान या संघाने मिळविला.
या संघाला पाच हजार रुपयांचे बक्षीस आकाश पाटील यांच्याकडून देण्यात आले. चौथा क्रमांक कनका बॉईज संघाने मिळविला या संघाला चार हजार रुपयांचे बक्षीस अंजली पाटील यांनी दिले. उत्कृष्ट रायडर म्हणून महेश गावडे यांना ढाल बक्षीस प्रशांत राऊत यांच्याकडून देण्यात आले. उत्कृष्ट डिफेंडर सम्मेद पाटील यांची निवड झाली. तसेच प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून विशाल राऊत यांना बक्षीस देण्यात आले. पिरवाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा बिंदले यांनी या स्पर्धेसाठी 51 हजार रुपयांची देणगी दिली. बसवराज रायवगोल, विश्वनाथ तेरदाळ, योगेश चौगुले, अयोजित काळगे आदींनी विजेत्या संघांना चषक दिले. प्रत्येक सामन्यातील सामनावीर चषक सुरज पाटील यांच्या वतीने देण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून अविनाश पाटील, सुनील बेळगुंदकर, आनंद पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वैजनाथ पाटील, सुनील कटबूगोळ, गणेश मुचंडीकर, विशाल शहापूरकर, शिवम आपटेकर, योगेश चौगुले, शेखर मुचंडीकर, रवी पाटील, परशराम मलतवाडी, नवीन कंची आदींनी परिश्रम घेतले .राजू मुचंडीकर यांनी सूत्रसंचालन केले तर राकेश तारीहाळकर यांनी आभार मानले.









