बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त, धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए फोर्थ डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात के. आर. शेट्टी लायाज अकादमी ब संघाने एमसीसी अकादमीचा 97 धावांनी तर माळमारुती क्रिकेट क्लब अ ने एसकेई सोसायटी स्पोर्ट्स अकादमी ब संघाचा 7 गड्यांनी पराभव केला. प्रशांत लायंदर याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए बेळगाव मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात के. आर. शेट्टीने प्रथम फलंदाजी करताना 29 षटकात 6 गडी बाद 198 धावा केल्या. त्यात प्रशांत लायंदरने 8 चौकारासह 63, गुरुप्रसादने 2 षटकार 6 चौकारासह 46, रवी एच.ने 24, जयदीप एम.ने नाबाद 34 धावा केल्या. एमसीसीतर्फे चैतन्याने 3 तर दिगंनाथ 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसी अकादमीचा डाव 16 षटकात 101 धावांत आटोपला. त्यात गजाननने 21, चैतन्य व प्रेम यांनी प्रत्येकी 15 धावा केल्या. के.आर.शेट्टीतर्फे राहुल शिंदेने 20 धावांत 3, सुनील सक्री, प्रशांत लायंदर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात एसकेई सोसायटीने प्रथम फलंदाजी करताना 28.5 षटकात सर्वगडी बाद 149 धावा केल्या. त्यात मंथन देसाईने 28, रवी नार्वेकरने 23, कृष्णा रेड्डीने 22, पार्थ केळुसकरने 17 तर लक्ष्मीकांत लोहारने 15 धावा केल्या. माळमारुतीतर्फे राहुल बजंत्री, बाळकृष्ण डी., अशोक के., प्रकाश पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना माळमारुतीने 19 षटकात 3 गडी बाद 153 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. राहुल बजंत्री 1 षटकार 8 चौकारांसह नाबाद 57 तर सुभाष के.ने 1 षटकार 4 चौकारासह 39, प्रकाश पाटीलने 22 तर एन. बी. पाटीलने 14 धावा केल्या. एसकेईतर्फे पार्थ व कृष्णा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.









