स्वयं खोत सामनावीर, फरहान शेख मालिकावीर

बेळगाव ; केआर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित केआर शेट्टी चषक 12 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अतितटीच्या लढतीत केआर शेट्टी लायाज संघाने युनियन जिमखाना संघाचा केवळ 2 धावांनी पराभव करून दुसरा केआर शेट्टी चषक पटकाविला. स्वयं खोतला सामनावीर तर फरान शेखला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. य् ाgनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात केआर शेट्टी लायाज संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 9 गडीबाद 134 धावा केल्या. तर स्वयं खोतने 2 षटकार 5 चौकारांसह 40, अखिलेशने 5 चौकारांसह 30 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे फरान शेखने 20 धावात 4, शाहरुख दिलवालेने 17 धावात 2, हमजा सराफने 21 धावात 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 25 षटकात 9 गडीबाद 132 धावा केल्या. केवळ 2 धावांनी सामना गमवावा लागला. त्यात फरहान शेखने 4 चौकारांसह 26 धावा केल्या. केआर शेट्टी लायाजतर्फे स्वयं खोतने 22 धावात 2, हर्षित, कांदू, वरदराज, विनायक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते प्रणय शेट्टी, रोहित पोरवाल, चंदन कुंदरनाड, ताहीर सराफ, पुनीत शेट्टी, वसिम धामणेकर, प्रसन्ना शेट्टी, प्रशांत लायंदर, राहुल मगदूम, सलमान गोकाकर, अॅड. शिवाजी पाटील, राघवेंद्र कडलगी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेते केआर शेट्टी लायाज संघाला व उपविजेत्या युनियन जिमखाना संघाला चषक व दोन्ही संघाच्या खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर स्वयं खोत, उत्कृष्ट फलंदाज आरुश देसूरकर, उत्कृष्ट गोलंदाज कांदू पाटील, स्पर्धेतील इंपॅक्ट खेळाडू स्वयम खोत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक महम्मद हमजा तर मालिकावीर म्हणून फरहान शेख यांना चषक व पदके देऊन गौरविण्यात आले.









