मुंबई :
केपीआयटी टेक या कंपनीचा समभाग सध्याला घसरणीत असताना दिसतो आहे. सदरचा कंपनीचा समभाग दोन सत्रात 13 टक्के इतका खाली आला असल्याची माहिती आहे. कंपनीचा समभाग बुधवारी 6 टक्के इतका घसरत 1415 रुपयांवर खाली आला होता. सदरचा समभाग 1380 किंवा 1365 रुपयांपर्यंत खाली घसरु शकतो, असा तज्ञांचा अंदाज आहे. पण वर्षभरात या समभागाने गुंतवणूकदारांना 106 टक्के इतका परतावा दिला आहे.









