कोयनेत पावसाची संततधार सुरूच..!
सातारा : कोयना पाणलोट क्षेत्रात शनिवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू असल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ सुरू झाली आहे.केवळ बारा तासांत कोयना धरणात दीड टीएमसीने वाढ झाली आहे.परिणामी शनिवारी सकाळी धरणाच्या पाणीसाठ्याने २५ टीएमसीचा टप्पा पार केला.शनिवारी दिवसभर कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार पावसाचा जोर कायम असल्याने शनिवारी सायंकाळी पाच पर्यंत धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होणार आहे.
दरम्यान कोयना पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या संतधार पावसामुळे धरण पाणलोट क्षेत्रातून शनिवारी सकाळी आठ पर्यंत कोयना येथे ७६(९५१),नवजा येथे ८९ (१२६९) आणि महाबळेश्वर येथे १३५ (१२४३)मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे तर कोयना धरणात प्रतिसेकंद २६ हजार ७३६ क्यूसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून धरणात २५.२३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.









