कोयनानगर :
सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्याने कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून शुक्रवार 3 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता विद्युत गृहाचे दुसरे युनिट सुरु करून कोयना नदी पात्रात एकूण 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे.
कोयना धरण पायथा विद्युत गृहातील एक युनिट आधीपासूनच सुरू असून सांगली पाठबंधारे विभागा कडून सिंचनाची मागणी आणखी वाढल्याने शुक्रवार 3 रोजी दुपारी 12 वाजता कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातील दुसरे युनिट सुरु करण्यात येणार आहे. कोयना नदीपात्रामध्ये एकूण 2100 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याने कोयना नदी काठाच्या गावातील लोकांनी सतर्क राहावे, अशी कोयना सिंचन विभागाच्या व्यवस्थापन विभागा कडून कळविण्यात आले आहे.








