आचरा/ प्रतिनिधी–
नऊ ऑगस्ट या क्रांतिदिनी आचरा हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे स्मारक येथे हुतात्मा दत्तारामभाऊ कोयंडे यांच्या स्मारक स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मंडल अधिकारी अजय परब, निलेश सारजोशी, तलाठी आचरा अनिल काळे, आचरा हायस्कुल मुख्याध्यापक गोपाळ परब, पोलीस कोतवाल गिरीश घाडी, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते
हुतात्मा कोयंडे या कोयंडे यांचा जन्म आचरा पिरावाडी येथे झाला. महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रह चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. मिठाच्या सत्याग्रहात ते पहिले हुतात्मा ठरले होते.









