ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँग धुमाकूळ घालत आहे. या गँगचे लोण आता शाळांपर्यंत पोहचले आहे. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्यावर तरुणाने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घडली. या घटनेत विद्यार्थी जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय आरडे असे हल्ला झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तुळशीबागेत काम करणाऱ्या समीर पठाण या तरुणाच्या मैत्रिणीशी तो बस स्टॉपवर बोलत होता. याचाच राग मनात धरून पठाण विजय आरडेवर धावून गेला. दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर पठाणने विजयवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात शेजारी असलेला दुसरा विद्यार्थीही किरकोळ जखमी झाला आहे. जखमी विजय आरडे या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कालच पोलिसांनी या शाळेत गुन्हेगारीबद्दल समुपदेशन केले होते.
अधिक वाचा : महाराष्ट्रात थंडी पुन्हा वाढणार









