वृत्तसंस्था / कोलकाता
मंगोलीयात शुक्रवारपासून सुरू झालेल्या विश्वचषक आंतरराष्ट्रीय स्नुकर स्पर्धेत भारताचे आव्हान प्रामुख्याने विद्यमान राष्ट्रीय विजेता सौरभ कोठारीकडे राहिल.
आयबीएसएफच्या या सहाव्या विश्व रेड स्नुकर चॅम्पियनशीप स्पर्धेत सौरभ कोठारीला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला. सदर स्पर्धा 21 ते 25 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय स्पर्धकांमध्ये प्रामुख्याने पारस गुप्ता आणि कमल चावला यांचा सहभाग राहिल. सदर स्पर्धेमध्ये 20 देशांचे स्नुकरपटू भाग घेत आहेत.









