वृत्तसंस्था/ चेन्नई
भारतीय फुटबॉल संघात बचावफळीत खेळणारा प्रीतम कोटलचा इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेसाठी चेन्नईन एफसी क्लब संघामध्ये समावेश करण्यात आला आहे.
अलिकडेच प्रीतम कोटल आणि चेन्नईन एफसी फुटबॉल क्लब यांच्यात नुकताच नवा करार झाला आहे. कोटलसमवेत चेन्नईन एफसीने अडीच वर्षाचा करार केला आहे. यापूर्वी कोटल केरळ ब्लास्टर्स एफसी संघाकडून खेळत होता. 31 वर्षीय प्रीतम कोटलने आतापर्यंत 50 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.









