वृत्तसंस्था / राजगिर (बिहार)
2025 च्या आशिया चषक पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यमान विजेत्या कोरियाच्या पुरुष हॉकी संघाचे बिहारमध्ये रविवारी रात्री उशीरा आगमन झाले. सदर स्पर्धा 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे.
कोरियाचा पुरुष हॉकी संघ हा या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. कोरियाचे नेतृत्व जाँगसुक बेई करीत आहेत. पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या इतिहासामध्ये कोरियाचा हॉकी संघ हा सर्वात प्रबळ म्हणून ओळखला जातो. कोरियाचा पुरुष हॉकी संघ आशिया चषक स्पर्धेतील एक यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. कोरियाच्या पुरुष हॉकी संघाने आशिया चषक हॉकी स्पर्धा आतापर्यंत विक्रमी पाचवेळा जिंकली आहे. 2022 मध्ये जकार्ता येथे झालेल्या या स्पर्धेत केरिया संघाने अंतिम सामन्यात मलेशियाचा 2-1 असा गोल फरकाने पराभव करुन पहिल्यांदाच या स्पर्धेचे विजेतेपद मिळ्रवले होते.
पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. कोरिया, मलेशिया, बांगलादेश आणि चीन तैपेई हे चार संघ ब गटात आहेत. 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत विद्यमान विजेता कोरियाचा समावेश ब गटामध्ये आहे. या गटात मलेशिया, बांगलादेश आणि चीन तैपेईचा समावेश आहे. विद्यमान विजेत्या कोरियाचा या स्पर्धेतील पहिला सामना 29 ऑगस्टला चीन तैपेईबरोबर होत आहे. 30 ऑगस्ट रोजी कोरियाची लढत मलेशियाबरोबर तसेच बांगलादेशबरोबरची लढत 1 सप्टेंबरला होणार आहे.









