रत्नागिरी :
कोकण रेल्वेने मागील आर्थिक वर्षात ४,०७० कोटींची उलाढाल केली असून त्यात विक्रमी ३०१ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. कोकण रेल्वेची ही प्रगती पाहता भविष्यात आणखी मोठे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. मात्र कोकण रेल्वे महामंडळाची नफ्यातील आर्थिक स्थिती पाहता या महामंडळाच्या केंद्राकडे समायोजनाबाबत राजकीय मुद्दा उपस्थित होत असला तरी कोणतीही अधिकृत सूचना आमच्याकडे नसल्याचे चेअरमन संतोषकुमार झा यांनी पत्रकार
परिषदेत सांगितले.
रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी कोकण रेल्वेच्या प्रगतीचा आढावा येथील एमआयडीसी विभागीय कार्यालय येथे सोमवारी पत्रकारांसमोर मांडला.








