रत्नागिरी: सध्या सर्वत्र अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी समुद्रालाही मोठे उधाण आले
असून लाटांचा जोरदार तडाखा किनारपट्टीला बसू लागला आहे. अजूनही जुलै महिन्यात 6 वेळा, ऑगस्ट महिन्यात 7 वेळा व सप्टेंबर महिन्यात 6 वेळा मोठे उधाण येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पावसाळ्यात समुद्राला उधाण आल्याने लाटांचा वेग कमालीचा वाढला आहे.दरम्यान, या कालावधीत येणाऱ्या मोठ्या भरतीवेळी उधाणाचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. या हंगामातही समुद्रात 26 वेळा उधाण येईल अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन स्तरावरून किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना
सतर्कतेचा इशारा प्रादेशिक बंदर विभागाकडून यापूर्वीच देण्यात आला आहे.
समुद्राला येणाऱ्या उधाणाचा येथील किनारपट्टीवरील रहिवाशांना फटका बसत असतो. या उधाणावेळी जर मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असेल तर समुद्रकिनऱ्या सोबतच खाडी किनाऱ्यावरील वस्त्यांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. बंदर विभागामार्फत या काळात बंदरात धोक्याची सूचना म्हणून बंदरातून बावटा लावण्यात आला आहे. तसेच या काळात मच्छीमार तसेच नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, असाही इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा- दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव ! कशेडी घाटात मालवाहू ट्रकचे झाले दोन तुकडे
आगामी काळातील समुद्राला येणाऱ्या भरतीचे दिवस
जुलै महिन्यामध्ये बुधवार रविवार 17 जुलै या कालावधीत मोठी भरती येणार आहे. या काळात समुद्रात 4 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणारआहेत. तसेच 30 व 31 जुलै हे दिवसही मोठ्या भरतीचे असणार आहेत.ऑगस्ट महिन्यामध्ये गुरुवारी 11 ते सोमवार 15 ऑगस्ट या काळात भरती येणारआहे. या कालावधीत 2 ते सव्वा दोन मीटर उंचीच्या लाटा उसळतील. 29 व 30ऑगस्ट या दिवशीही मोठी भरती असणार आहे.सप्टेंबर महिन्यात शुक्रवार 9 ते 13 सप्टेंबर हे मोठ्या उधाणाचे दिवस असून या काळात 2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
Previous Articleनदीकाठच्या 34 गावांना अलर्ट
Next Article डॉ. अशोक कामत यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा









