वेंगुर्ले (वार्ताहर)-
देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून वेंगुर्ला नगरपालिकेचा गौरव देशात आहे .१० गुंठे जागेमध्ये संपूर्ण शहराच्या कचऱ्याचे नियोजन , शिस्तबध्द नागरिक आणि संपूर्ण देशातील सर्वात शिस्तबध्द कचरा संकलन करणारं आदर्श शहर अशी वेंगुर्लेची ओळख. शहरासाठी सुसज्ज वातानुकुलित नाट्यगृह, मॉल, क्लब हाऊस, आणि स्टेडियम, कोकणातील सर्वात सुंदर पायाभूत सुविधा असलेले शहर आहे . नगराध्यक्ष या नात्याने सर्वपक्षांच्या नगरसेवकांना एकत्र आणून शिस्तबध्द पध्दतीने आपल्या शहराचे टीमवर्कच्या माध्यमातून त्यांनी विकास साधला. यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब, कोकण बिझनेस फोरम, ग्लोबल कोकण या संस्थतर्फे वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना कोकण आयडॉल सन्मान पुरस्कार दिलीप गिरप यांना घोषित केला आहे.
कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब, कोकण बिझनेस फोरम, ग्लोबल कोकण या संस्थतर्फे भव्य कोकण आयडॉल सन्मान सोहळा कोकण व्हिजन २०२३ परिषद रविवार, दि. १६ जुलै सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजता यावेळेत मुंबई दादर (पूर्व) हिंदू कॉलनी येथील प्राचार्य बी.एन. वैद्य सभागृहांत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमांस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती शिवरायांच्या परिवारातले तंजावर तामिळनाडूचे राजे श्रीमंत बाबाजी राजे भोसले, छत्रपती शिवरायांचे नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, लोकमान्य टिळक यांचे वंशज कुणाल टिळक या मान्यवरांच्या उपस्थितीत या कोकण आयडॉलचे वितरणाने सन्मान करण्यात येणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









