वृत्तसंस्था / पुणे
येथे सुरू असलेल्या फिडेच्या महिलांच्या ग्रा प्रि बुद्धिबळ स्पर्धेत भारतातील महिला ग्रॅन्ड मास्टर बुद्धिबळपटू कोनेरू हंपीने चौथ्या फेरीतील डावात रशियाच्या पोलिना शुवालोव्हाचा पराभव केला. या विजयामुळे आता स्पर्धेच्या गुण तक्त्यात चौथ्या फेरी अखेर हंपी दुसऱ्या स्थानावर असून चीनची झू जिनेर पहिल्या स्थानावर आहे.
चीनच्या झु जिनेरने चौथ्या फेरीतील डावात पोलंडच्या अॅलिना कॅशलीन्स्कायवर शानदार विजय मिळविला. या विजयामुळे जिनेर 3.5 गुणासह पहिल्या स्थानावर आहे. चौथ्याफेरीतील अन्य एका डावात भारताच्या दिव्या देशमुखने मेलिया सेलोमीवर शानदार विजय नोंदवित पूर्ण गुण वसुल केला. कोनेरु हंपीने रशियाच्या शुवालोव्हाचा 37 व्या चालीत पराभव केला. द्रोणावली हरिका आणि वैशाली यांच्यातील डाव बराब्sारीत राहिला.









