Komsap Malvan program concluded at Bhadrakali Library
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मालवण नजिकच्या भद्रकाली ग्रंथालयात कोमसाप मालवण कार्यकारिणी सदस्य सदानंद कांबळी यानी गोष्टी, गाणी, गप्पा असा कार्यक्रम सादर केला. या प्रसंगी त्यानी मराठी भाषेचे महत्व सांगून आपल्या विशिष्ट शैलीत गोष्टी, गाणी, गप्पा द्वारे उपस्थित महिला, ग्रामस्थ याना मराठी भाषेचे महत्व पटवून दिले.
मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त ग्रंथालयात विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. बहुसंख्य ग्रामस्थ, मुले यांची उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी तसेच गावच्या नूतन सरपंच श्रध्दा वेंगुर्लेकर-कांबळी यानी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रम प्रसंगी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष अरविंद कांबळी, चिटणीस जयराम कांबळी, माजी सरपंच प्रिया कांबळी, सामाजिक कार्यकर्ते नरेश कांबळी, दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापिका, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ-मुले उपस्थित होती
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथपाल निलिमा मयेकर व सहकारी यानी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजय कांबळी यांनी मानले.
मालवण / प्रतिनिधी